शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

किणी परिसरात लुटारूंचा धुमाकूळ

By admin | Updated: October 19, 2014 00:44 IST

दाम्पत्यास मारहाण करून लुटले : गायकवाड मळ्यातही तिघांना मारहाण

किणी : रात्रीच्या वेळेत शेतात वस्तीस जाणाऱ्या आदम लाड, पत्नी नूरजान लाड यांना जबर मारहाण करून, सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, तर गायकवाड मळ्यात वस्तीस असणाऱ्या तेजस महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून सोन्याची चेन, तीन हजार रुपये, अशा पाऊण लाख रुपयांच्या ऐवजांची अज्ञात चोरट्यांनी लूट केल्याची घटना किणी (ता. हातकणंगले) येथे काल, शुक्रवारी रात्री उशिरा घडली.किणी-तळसंदे रस्त्यावरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आदम लाड व त्यांच्या पत्नी नूरजान शेतावर नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून वस्तीस जात होते. दरम्यान, ओढ्याच्या पुलाजवळ दबा धरून बसलेल्या पाच ते सात अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली व त्यांच्याकडील मोबाईल, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी हिसकावून घेऊन पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या आदम लाड यांनी गावामध्ये येऊन युवकांना कल्पना दिली. युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या चोरट्यांनी महामार्गालगत असणाऱ्या गायकवाड मळ्यात वस्तीस असणारे तेजस महाजन, रोहिणी महाजन व विजयमाला परीट यांना मारहाण करून एक तोळ्याची सोन्याची चेन व रोख तीन हजार रुपयांची लूट केली. हा प्रकार सुरू असताना शोध घेणारे तरुण याठिकाणी दाखल होताच चोरटे आणि युवकांच्यात धुमश्चक्री झाली. मात्र, चोरट्यांकडे धारदार शस्त्रे असल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले. किणी-तळसंदे रस्त्यावर आजअखेर तीन ते चारवेळा असा प्रकार घडल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, या चोरट्यांचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या चोरट्यांचा तासाहून अधिक काळ धुमाकूळ सुरू होता.