कोल्हापूरात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा; आरोग्य विभागाची कारवाई
By उद्धव गोडसे | Updated: June 12, 2023 14:45 IST2023-06-12T14:45:17+5:302023-06-12T14:45:43+5:30
महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी छापा टाकून ही करवाई केली.

कोल्हापूरात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा; आरोग्य विभागाची कारवाई
कोल्हापूर : राजारामपुरी येथील पहिल्या गल्लीतील श्री हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी छापा टाकून ही करवाई केली.
गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या महीलेनेच याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दिली. शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या प्रकरणे खळबळ उडाली. हॉस्पिटलमध्ये गर्भलिंनिदान मशीन सापडले.
गर्भलिंग निदान करण्यासाठी महिलेकडून १५ हजार रुपये घेलले असून, गर्भपात करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. महापालिकेचे आरोग्य अधिकार डॉ. रमेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.