इचलकरंजीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:58+5:302021-06-21T04:16:58+5:30

: दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सांगली रोड परिसरामध्ये दोन ठिकाणी जुगार सुरू असल्याची ...

Raid on gambling dens at two places in Ichalkaranji | इचलकरंजीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा

इचलकरंजीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा

: दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : सांगली रोड परिसरामध्ये दोन ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइल व मोटारसायकल असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी, पाटील मळा परिसरातील दिलीप पाटील यांच्या मालकीच्या खोलीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबाजी नारायण ताला (वय ७२, रा. सोलगेमळा), बाळगोंडा शिवगोंडा पाटील (५४), बजरंग कल्लाप्पा लोकरे (४५, दोघे रा. पाटील मळा), नागेश गोपाळ शेरीगार (५०, रा. यशवंत कॉलनी) व सुभाष यशवंत पाटील (५८, रा. शाहू पुतळा परिसर) या पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५०० रुपये रोख, दोन मोबाइल असा १३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, पाटील मळा येथील उल्हास रायगोंडा पाटील यांच्या घराच्या गच्चीवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उल्हास पाटील याच्यासह अमित वसंत ताटे (४०, रा. गावभाग), महादेव बसगोंडा पाटील (५४, रा. टाकवडे, ता. शिरोळ), भीमराव रुद्रगोंडा पाटील (६१, रा. जुना चंदूर रोड), महादेव इराप्पा नाईक (२८), आनंदराव बाळासाहेब पाटील (४४, दोघे रा. सोलगेमळा), धर्मेंद्र रावसाहेब कागवाडे (४५, रा. टाकवडे वेस), ईश्वर गोवर्धनसिंह शेखावत (५२, रा. जुना चंदूर रोड) या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल, चार मोटारसायकली व रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Raid on gambling dens at two places in Ichalkaranji