शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:23 IST

collector Kolhapur : अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सहसचिव म्हणून बदली झाली आहे.

ठळक मुद्देराहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी दौलत देसाई वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सहसचिव

कोल्हापूर : अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सहसचिव म्हणून बदली झाली आहे.

महापूर, कोरोना सारख्या आपत्तीत कोल्हापूरकरांची काळजी तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांनी करवीरवासीयांच्या कायम लक्षात राहील इतके चांगले काम गेल्या अडीच वर्षांत केले. सेवेतील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मंगळवारी रात्री शासनाच्या वतीने या बदल्या जाहीर करण्यात आल्या.राहुल रेखावार हे मूळचे खडकी बाजार, (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील असून त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले.

बारावीत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. त्यानंतर भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ते देशात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

ऑगस्ट २०१२ मध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. एक वर्षाने गडचिरोलीत सहायक जिल्हाधिकारी व तेथील इटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणूनही काम केले. याच पदावर त्यांची २०१४ मध्ये नागपूरला बदली झाली. त्यानंतर त्यांनी हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महापालिका आयुक्त धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. जुलै २०१९मध्ये त्यांनी औरंगाबाद महावितरणमध्ये सहायक संचालक पदाची धुरा सांभाळली.

बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. आठ महिन्यांपूर्वी त्यांची अकोल्यात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. शिस्तीचे व निर्भिड,धडाकेबाज निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.देसाई यांचे स्मरणात राहणारे कामविद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या अडीच वर्षांत झोकून देऊन काम केले. रुजू झाल्यानंतर काही महिन्यातच आलेल्या महापूर काळात त्यांनी नागरिकांचे स्थलांतर, सोयी सुविधा, पुढे पुनर्वसनाची तातडीने कार्यवाही केली. गेल्यावर्षापासून सुरू झालेल्या कोरोना काळातही त्यांनी आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधील अनुभव पणाला लावत यंत्रणेचे योग्य नियोजन करत पहिल्या लाटेतून कोल्हापूरला सुखरूप बाहेर काढले.

सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यानही त्यांनी परिस्थिती गंभीर होऊ दिली नाही,याशिवाय महसूल यंत्रणेतील कामात सुसूत्रता आणत सर्वसामान्यांच्या सोयीसाठी महसूल जत्रा सारखा अभिनव उपक्रम राबवला या अंतर्गत कूळ कायद्याचे कलम ४३ हटवणे, कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनींचा वहिवाटीचा हक्क, शाहूवाडीतील मौजे मरळे येथील कुटुंबांना, हेरसरंजाम येथील नागरिकांना मालकी हक्काने जमीन, मातंग वसाहतीतील ४०० भूखंड त्यांच्या मालकीचे करणे यासह अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या काळात घेतले. कोल्हापूरकरांच्या कायम स्मरणात राहील इतके चांगले काम त्यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर