शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राहुल आवाडेंचा जिल्हा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 11, 2015 00:10 IST

कोल्हापुरातील प्रकार : व्याज सवलतीपोटी सहा कोटींची मागणी; धिंगाणा, कर्मचाऱ्यांनी आवाडे कुटुंबीयांना पिटाळले

कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा महिला सहकारी सूतगिरणीला शासनाच्या व्याज सवलत योजनेतील सहा कोटी द्यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे युवा नेते व आॅल इंडिया को-आॅपरेटिव्ह स्पिनिंग मिल फेडरेशनचे उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी येथील जिल्हा मध्य. सहकारी बँकेत विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘येथून माझं प्रेतच जाईल, पैशासंबंधी हमीपत्र द्या,’ असे म्हणत त्यांनी धिंगाणा घातला. पोलिसांनी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे आणि पुत्र राहुल यांना ताब्यात घेतले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आवाडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या सूतगिरणीला जिल्हा बॅँकेने चार कोटी ८३ लाखांचे कर्ज दिले होते. त्यावर दोन कोटी ६३ लाख रुपये व्याज झाले होते. राज्यातील सहकारी सूतगिरण्यांसाठी शासनाच्या व्याज सवलत योजनेत कर्जाची पुनर्रचना केली. त्यात व्याज सवलत देऊन पाच कोटी ४४ लाख रुपये कर्ज राहिले. हे कर्ज दहा वर्षांत आठ हप्त्यांत भरण्याचे सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने मान्य केले. त्यानुसार नियमित हप्ते भरले आहेत. ६३ लाखांचा एक याप्रमाणे दोन हप्ते भरणे शिल्लक आहेत. ते व्याज सवलतीतून कपात करून घ्यावेत व उर्वरित रक्कम द्यावी, या मागणीसाठी राहुल यांनी यापूर्वी तीनवेळा बँकेत हुज्जत घातली होती. मंगळवारी सकाळी राहुल व सूतगिरणीच्या संचालकांचे शिष्टमंडळ बँकेत आले. तेथे राहुल यांनी चव्हाण यांच्याशी हुज्जत घातली. काही वेळानंतर त्यांनी बाहेर जाऊन कसल्या तरी गोळ्या खाल्ल्या. ‘मी आत्महत्या करणार आहे, व्याजापोटी सहा कोटी रुपये द्यावेत, यापोटी हमीपत्र द्यावे,’ अशी मागणी केली. यावर चव्हाण यांनी ‘बँक तुम्हाला काहीही देणे नाही,’ असे ठणकावून सांगितले. पोलिसांनी राहुल, किशोरी आवाडे यांच्यासह शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना ताब्यात घेतले. वर्षात आत्महत्येचा दुसऱ्यांदा प्रयत्न याच मागणीसाठी राहुल यांनी ३० आॅगस्ट २०१४ रोजी राज्य सहकारी बॅँकेच्या मुंबई येथील सर्वसाधारण सभेत हाताची नस कापून घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्हा बॅँकेत येऊन त्यांनी दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.