शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:59 AM

आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली.

कोल्हापूर : आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली. आता राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याचे सरकार सांगत आहे. ही बाब अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. पलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यग्र होते, अशी टीकाही पवार यांनी केली.येथील राष्टÑवादी कॉँग्रेसचे बूथ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, जवानांच्या वाहनांवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली; पण पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे पक्षप्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती. प्रधानमंत्री तर हल्ल्यानंतरही कामांची उद्घाटने करीत, पक्षाचा प्रचार करीत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टीका केली नाही. निवडणुका येतील, जातील. अशा कठीण प्रसंगात लष्कराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. दुर्दैवाने जवानांच्या त्यागाचा राजकीय लाभ उठविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, असे पवार म्हणाले.सरकारकडून जनतेची फसवणूकसरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्या सगळ्या फसव्या निघाल्या आहेत. नोटाबंदी केल्यामुळे १५ लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. कर्जाचा बोजा वाढतोय तशा आत्महत्याही वाढत आहेत. जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत या सरकारच्या कारकिर्दीत ११ हजार ९९८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी केवळ महाराष्टÑाची आहे. समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. पण त्यातही फसवणूक केली गेली, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRafale Dealराफेल डील