करवीर पोलीस उपाधीक्षकपदी आर. आर. पाटील रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:27 IST2021-02-09T17:23:26+5:302021-02-09T17:27:25+5:30
Police Kolhapur- कोल्हापूर येथील करवीर पोलीस उपाधीक्षकपदाचा कार्यभार आर. आर. पाटील तथा राजाराम पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्वीकारला.

करवीर पोलीस उपाधीक्षकपदी आर. आर. पाटील रुजू
ठळक मुद्देकरवीर पोलीस उपाधीक्षकपदी आर. आर. पाटील रुजूपोलीस दलामध्ये तीन तपाहून अधिक काळ काम
कोल्हापूर : येथील करवीर पोलीस उपाधीक्षकपदाचा कार्यभार आर. आर. पाटील तथा राजाराम पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्वीकारला.
पोलीस दलामध्ये तीन तपाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. तीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी दोन वेळा राष्ट्रपती पदक, ६५१ रिवॉर्ड मिळाले आहेत.
पुणे पिंपरी चिंचवड सहायक आयक्तपदावरून त्यांची कोल्हापुरात करवीर पोलीस उपाधीक्षकपदी बदली झाली आहे. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कोडोली, जयसिंगपूर, विशेष पथक, नागरी हक्क संरक्षण, शहर वाहतूक नियंत्रण विभागात पोलीस निरीक्षक, वाई-सातारा, शाहुवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षकपदावर सेवा बजावली आहे.