आर. के. नगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:25 IST2019-09-23T18:24:04+5:302019-09-23T18:25:24+5:30
आर. के. नगर आणि जाधव पार्क परिसरातील तीन बंद बंगले फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकावेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

आर. के. नगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न
कोल्हापूर : आर. के. नगर आणि जाधव पार्क परिसरातील तीन बंद बंगले फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकावेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.
पोलिसांनी सांगितले, आर. के. नगर येथे रमेश दत्तात्रय दीक्षित, जाधव पार्क येथे राजेश पांडुरंग कालेकर व कुंडलिक रामचंद्र शेरवे यांची घरे आहेत. तिघेही कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांची घरे बंद होती. शनिवारी (दि. २१) रात्री चोरट्यांनी या तीन बंगल्यांना लक्ष करीत कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला.
बेडरुम, किचनमधील साहित्य विस्कटून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला असता, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. रविवारी तिन्ही कुटुंबे परत घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रदीप हणमंतराव मोरे (६५, रा. उजळाईवाडी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.