बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा, अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:36 IST2021-08-30T15:11:24+5:302021-08-30T15:36:14+5:30

Balumama serial : एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे.

Quickly remove a photo of Manohar Bhosale shown in Balumama's series, otherwise ... | बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा, अन्यथा... 

बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा, अन्यथा... 

सरवडे :दूरदर्शनवर सुरू असलेल्या एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या प्रारंभी मनोहर भोसले याचा दाखवला जाणारा फोटो त्वरित काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने या मागणीचे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. तर आदमापूरातील बाळूमामा देवालय समितीच्यावतीनेही भोसले याचा निषेध केला आला आहे.

एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. आमचा मालिकेला विरोध नाही; पण प्रारंभी जो भोसले याचा फोटो दाखवला जातो त्याला आमचा विरोध आहे. या फोटोमुळेच भोळीभाबडी भक्तमंडळी त्याच्या आहारी जात आहेत असे दिसते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आदमापूर परिसरातील काही गावांमधील सुज्ञ नागरिक यांचा थेट उंदरगावाशी संबंध आला आहे. ज्यावेळी मनोहर भोसले आदमापूर परिसरात आला त्यावेळी त्याच्या गाडीतून काहीजण फिरले आहेत. त्यात काही नेतेमंडळींचा समावेश आहे. यामुळेच त्याने या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. भोसलेबाबत भक्तांमध्ये प्रचंड चीड आहे. आता आपली मोठ्या प्रमाणात फसगत झाली असल्याचेही भक्त बोलत आहेत.

बाळूमामा देवालय समितीकडूनही निषेध
बाळूमामा यांच्या नावाचा गैरवापर करून आपला आर्थिक लाभ उठवणारा मनोहर भोसले (उंदरगाव) याचा बाळूमामा देवालय समितीने ठरवाद्वारे निषेध केला आहे. या ठरावाला लक्ष्मण पाटील सूचक, तर गोविंद पाटील अनुमोदक आहेत. दरम्यान लवकरच चार दिवसात यासंबंधी सविस्तर खुलासा देणार असल्याचे देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी सांगितले.
 

Web Title: Quickly remove a photo of Manohar Bhosale shown in Balumama's series, otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.