‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:55 AM2019-12-14T10:55:21+5:302019-12-14T10:58:44+5:30

लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे.

 Quick response to 'Lokmat Mahamarathon', hurry up for enrollment | ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा

‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा

Next
ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा विविध पाच गटांमध्ये सहभागी होण्याची संधी; नोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर

कोल्हापूर : लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे.

कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. नावनोंदणीच्या पहिल्या तीन दिवसांत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी करीत उदंड प्रतिसाद दिला आहे. तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपलाही सहभाग आजच नोंदवून निश्चिंत व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारीला पहाटे पाच वाजता या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यासाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ वर्षांपेक्षा जास्त) या गटांत होणार आहे.

तीन किलोमीटरची फॅमिली रन आणि पाच किलोमीटर अंतराचा गट असणार आहे. ती रन सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी ‘डिफेन्स’ हा वेगळा गट (२१ किलोमीटर) ठेवण्यात आला आहे. या मॅरेथॉनमधील विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

नावनोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर आहे. आरोग्यदायी, आनंददायक अनुभव घेण्यासाठी धावपटू, कोल्हापूरकरांनी त्वरित नावनोंदणी करावी. या महामॅरेथॉनच्या सीझन २ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. महामॅरेथॉनच्या सीझन ३ साठी आजच नोंदणी करा.

नावनोंदणीसाठी येथे संपर्क साधा
महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. २१ डिसेंबर २०१९ आहे; त्यामुळे नोंदणीसाठी त्वरा करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
 

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वात मीही सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होत आहे. या महामॅरेथॉनमधून खेळाडूंना प्रोत्साहन व आरोग्यविषयक जनजागृती होत आहे. यातून व्यायामाची सवय आणि त्याचे महत्त्व हा संदेश देण्याचे काम ‘लोकमत’ करीत आहे. यात मी सहभागी झालो असून, तुम्हीही सहभागी होऊन आरोग्यासाठी धावावे.
- चंद्रदीप नरके,
माजी आमदार, अध्यक्ष, कुंभी-कासारी साखर कारखाना, कुडित्रे.


‘लोकमत महामॅरेथॉन’ हा फिट कोल्हापूरकरांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे. मी यात सातत्याने सहकुटुंब सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेत आहे. तुम्हीही यात सहभागी होऊन धावण्याचा आनंद घ्या. तुम्हीही संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यसमृद्धीसाठी सहभागी होऊन इतरांना प्रवृत्त करा.
- उदय पाटील,
डबल आयर्नमन

शुल्क कमी, बक्षिसे मोठी

  • प्रकार                                         शुल्क        (अर्ली बर्ड शुल्क)              असे मिळणार साहित्य
  • ३ किलोमीटर (फॅमिली रन)      ४०० रुपये           ४०० रुपये                      टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन)           ६०० रुपये            ५०० रुपये                     टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन)       १२०० रुपये       ११०० रुपये                      टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                                        टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) १२०० रुपये          ११०० रुपये                   टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,
                                                                                                                  टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये             १,००० रुपये                टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,
                                                                                                                   टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

 

 

Web Title:  Quick response to 'Lokmat Mahamarathon', hurry up for enrollment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.