शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मिणचे येथील शेळी-मेंढीपालन संस्थेत पिग्मीचे अडकले ५० लाख, एजंटानेच डल्ला मारल्याचा संस्थेचे म्हणणे 

By विश्वास पाटील | Updated: January 20, 2026 12:52 IST

पिग्मीधारक झाले हवालदिल

विश्वास पाटीलकोल्हापूर : मिणचे (ता. हातकणंगले) येथील महालक्ष्मी भटकी जमात शेळी-मेंढीपालन संस्थेकडे पिग्मी एजंटाने जमा केलेले सुमारे ५० लाख रुपये परत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांनी पैसे भरले आहेत ते लोक रोज संस्थेत हेलपाटे मारत आहेत; परंतु त्यांना संस्थाचालक दाद देत नाहीत. यासंबंधीची तक्रार स्वत: पिग्मी एजंट ओम सोमाजी वाकसे यांनी सहायक उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे १३ जानेवारीस केली आहे.परंतु वाकसे यांनी पिग्मीची रक्कम गोळा करून संस्थाचालकांना अंधारात ठेवून ती ३ टक्के व्याजाने परस्पर कर्जाने वाटली आहे. सचिवांना हाताशी धरून त्यांने हा उद्योग केला आहे. ओम वाकसे हे आमच्या कुटुंबांशी संबंधित आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला; परंतु त्यांनीच फसवणूक केली असून आता आपली चामडी वाचवण्यासाठी संस्थेची बदनामी करत आहेत. संस्थेत एक रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही आणि सर्व पिग्मीधारकांचा एक रुपयाही आम्ही बुडवणार नाही, असे संस्थेचे संस्थापक प्रवीण वाकसे यांनी स्पष्ट केले. ओम वाकसे याच्याकडेच संस्थेचे ३२ लाख अडकले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या संस्थेचे कार्यालय गावातच ग्रामपंचायतीचा गाळा घेऊन त्यामध्ये सुरू आहे. संस्थेची मूळ नोंदणी २००८-०९ ची आहे; परंतु त्याचे लेखापरीक्षण २०१८पासून झालेले नाही. परिणामी पिग्मीची रक्कम किती थकीत आहे, संस्थेच्या ठेवींचे काय केले आहे, यासंबंधीची माहिती सहकार विभागाकडेही उपलब्ध नाही; परंतु सुमारे २०० ते २५० खातेदारांच्या सुमारे ५० लाख रुपये जे पिग्मीच्या स्वरुपात संस्थेत जमा केले होते ते अडकले आहेत. व्यापारी, शेतकरी, औषध दुकानदार, दूध उत्पादक रोज पिग्मी जमा करत होते. गेल्या काही दिवसांपासून ही रक्कम परत मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.पिग्मी एजंट ओम वाकसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत आहे; परंतु गेल्या एक वर्षापासून या संस्थेकडे जमा केलेली पिग्मी परत मिळालेली नाही. या संस्थेकडून कोणतीही शिक्क्याची पावती दिली जात नव्हती. पावतीवर सेक्रेटरी पद्मश्री धन्यकुमार देसाई व क्लार्क स्वाती सुभाष कागले यांच्या सह्या आहेत. कांही पावतीवर त्यांच्या सह्याही नाहीत. संस्थेच्या रजिस्टरला मात्र सर्व नोंदी आहेत.संस्थेचे संस्थापक प्रवीण नारायण वाकसे, अध्यक्ष तानाजी महादेव वाकसे व संचालक मंडळ संगनमताने ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. मी पिग्मीचा कालावधी पूर्ण झाली आहे अशी ५५ लाखांची रक्कम या संस्थेत जमा केली आहे. आता पिग्मीधारकांचा कोणताही संबंध नसल्याचे संस्था म्हणत आहे. तरी संस्थेवर दप्तर तपासणी करून संस्थेविरुद्ध कारवाई करावी.

वाकसे यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार या संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण करून घेण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवला आहे. तिकडून ऑर्डर आल्यावर तातडीने लेखापरीक्षण करून घेऊ. त्याशिवाय नक्की किती रकमेचा घोळ आहे, हे समजणार नाही. - प्रदीप मालगावे, सहायक निबंधक, दुग्ध, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Pigmy agent allegedly embezzled ₹50 lakhs from sheep-goat organization.

Web Summary : A pigmy agent allegedly embezzled ₹50 lakhs from a Kolhapur sheep-goat organization. Depositors are distressed as funds are missing. The agent accuses the organization of fraud, while the organization blames the agent for misappropriation. An audit is pending to ascertain the truth.