शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:45 AM

पन्हाळा शहर व परिसरातील गुंतवणूकदारांना ‘राईस पुलर पॉट’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदार हडबडले : सुमारे २ कोटींच्या फसवणुकीची भीती

नितीन भगवान ।पन्हाळा : पन्हाळा शहर व परिसरातील गुंतवणूकदारांना ‘राईस पुलर पॉट’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत अद्यापही तक्रारदार पुढे आले नसले तरी एक ते दीड वर्ष झाले तरी पैसे परत मिळत नसल्याने त्यांची बेचैनी वाढली आहे.

‘राइस पुलर पॉट’हा फसवणुकीचा एक नवाच फंडा पुढे आला आहे. पन्हाळा परिसरातील अनेकजण याला भुलले आहेत. काहींनी लाखात यामध्ये रक्कम गुंतवल्याची माहिती पुढे येत आहे. ‘राईस पुलर पॉट’ हे पंचधातूचे भांडे असून यावर वीज पडल्याचा दावा केला जातो. तसेच तांदूळ टाकले की या भांड्याकडे आकर्षित होतात, असे झाल्यास हे भांडे खरे असे सांगितले जाते. याबाबतचा व्हिडीओ गुंतवणुकदारांना दाखवून वीज पडलेल्या या भांड्याचा वापर उपग्रह तसेच यानात केला जात असल्याचे व याची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे खोटे सांगीतले जाते.

आपल्या कंपनीतर्फे हे भांडे २५० कोटी रुपयांना खरेदी करुन नासा किंवा इस्त्रो या कंपन्यांना एक हजार कोटींना विकले जाणार असून यामधून मिळणाऱ्या ७५० कोटी रुपये फायद्यातून प्रत्येक गुंतवणुकदारांना शंभरपट परतावा दिला जाईल, असे खोटे गणित मांडले जाते.

हे सर्व पटविण्यासाठी कंपनीची एक टीम सज्ज असते. आलिशान गाडी, त्यात उंची पेहराव केलेले चारजण, सोबत किमती लॅपटॉप, त्यात ‘राइस पुलर पॉट’ची व हे भांडे मी खरेदी करीत असल्याची शास्रज्ञांची क्लिप दाखविली जाते. ग्राहक पटला की त्याला रितसर कंपनीचे अ‍ॅग्रीमेंट करून देतात आणी हे पैसे घेऊन जातात.पन्हाळा शहरात या योजनेला भुलून वर्षभरात ७५ लाख ते एक कोटी रुपये लोकांनी गुंतविले असून, परिसरातून १.५ ते २ कोटी रुपये गुंतल्याचा आकडा पुढे येत आहे. यात लहान व्यावसायिक, नोकरदार, राजकारणी, व्यापारी, उद्योजक यांचा समावेश आहे.

पैसे गुंतवणूक वर्ष होवून गेले तरीही अद्याप रुपयाही न मिळाल्यांने चलबिचल झालेले गुंतवणूकदार २५० कोटी कंपनीकडे जमलेत का? यांची विचारणा करण्यासाठी सतत फोन करीत आहेत.पैसे परत मिळत नसल्याने मध्यंतरी काहीजण मुंबईला जाऊन तेथील कंपनीचे कामकाज पाहून तेथील कर्मचाऱ्यांना भेटून आल्याचे समजते. अजून २५० कोटी जमा झालेले नाहीत. जमा झाले की, आपल्याला कळविले जाईल. आणी ‘राईस पुलर पॉट’ विक्री झाला की आपल्याला बोलवून पैसे दिले जातील, असे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचे यातील कांही गुंतवणूकदारांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरFortगड