पुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:17 IST2021-08-05T18:14:32+5:302021-08-05T18:17:14+5:30

Flood Help Zp Kolhapur : एकीकडे आमची गावागावातील ग्रामस्थ महापुरामुळे अडचणीत सापडले होते. अनेकांना घरे सोडावी लागली. पुन्हा गावात येवून स्वच्छतेच्या कामाचे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंतू पुणे महापालिकेने तातडीने धाव घेवून या कामामध्ये जे सहकार्य केले ते कोल्हापूर जिल्हा परिषद कधी विसरणार नाही असे कृतज्ञतेचे उद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी काढले.

Pune Municipal Corporation's cooperation will not be forgotten: Rahul Patil | पुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटील

पुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटील

ठळक मुद्देपुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटीलस्वच्छता कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार

कोल्हापूर : एकीकडे आमची गावागावातील ग्रामस्थ महापुरामुळे अडचणीत सापडले होते. अनेकांना घरे सोडावी लागली. पुन्हा गावात येवून स्वच्छतेच्या कामाचे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंतू पुणे महापालिकेने तातडीने धाव घेवून या कामामध्ये जे सहकार्य केले ते कोल्हापूरजिल्हा परिषद कधी विसरणार नाही असे कृतज्ञतेचे उद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी काढले.

पुरानंतर महापालिकेने ६० कर्मचारी पाठवून करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ११ गावांमध्ये स्वच्छता केली. याबद्दल त्यांना आभार पत्र देवून गुरूवारी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.

जिल्हयातील पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेसाठी पुणे येथून जिल्हयामध्ये दाखल झालेले पथकाने शिये, चंदुर, इंगळी, शिरटी, हासुर, नांदणी, कवठेगुलंद, हेरवाड, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड, तालुका शिरोळ या ११ गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले काम केले. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचेही यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाचे आरोग्य निरिक्षक राजेश रासकर म्हणाले, यांनी पूरग्रस्त गावांमध्ये स्वछतेचे काम करत असताना, अनेक अडचणी आल्या पण तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांनी मोठे सहकार्य केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रियदर्शिनी मोरे, अरूण जाधव यांच्यासारखे अधिकारीही आमच्यासोबत कामात सहभागी झाल्याने आमचा उत्साह वाढला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम उपस्थित होते.


 

Web Title: Pune Municipal Corporation's cooperation will not be forgotten: Rahul Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.