शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'प्रकरणी पुण्यातील टोळी जाळ्यात, ४८ लाख गोठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:52 IST

काही बँक खात्यांचा दोन्हीकडे वापर, पाच जणांना अटक

कोल्हापूर : सम्राटनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील ज्येष्ठ नागरिकास ११ कोटींचा गंडा घालणारी टोळी पुण्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यांवरील ४८ लाख रुपये गोठवण्यात यश आले. यातील काही आरोपींचा दोन्ही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.बंडू हरिबा राठोड (वय ३७, सध्या रा. चाकण, पुणे, मूळ रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव), तेजस राहुल भालेराव (२१, रा. खोरवडे, ता. दौंड, जि. पुणे), विवेक उर्फ विकी भास्कर गवळी (२८, रा. तळवडे निगडी, पुणे), अक्षय रमेश कामठे (३०, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि क्षितिज चंद्रकांत सुतार (२४, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.सुतार हा या टोळीचा प्रमुख असून, तोच ऑनलाईन फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता. त्यांनी पुण्यात एका हॉटेलच्या खोलीत न्यायालय आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार केला होता. फसवणुकीतील रक्कम अटकेतील बंडू राठोड याच्या खात्यावर जमा झाली होती. ती पुढे अन्य खात्यांवर वळवण्यात आल्याचे तपासातून समोर आले. पुढील खातेधारकांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.आणखी तिघांची चौकशी सुरूजुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून, गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. यातील एका संशयिताच्या बँक खात्याचा वापर राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातही झाला आहे. त्यावरून या दोन्ही टोळ्या एकमेकांशी संबंधित असल्याचे समोर आले.४८ लाख गोठवलेराजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २८ लाख आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० लाख असे एकूण ४८ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित रक्कम पुढे अनेक खात्यांवर वर्ग झाली आहे. त्या खात्यांचा शोध घेऊन त्यावरील व्यवहार बंद करणे आणि रक्कम गोठवण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मुंबई पोलिसांकडूनही चौकशीऑनलाईन फसवणुकीतील गुन्ह्यात टोळी प्रमुखासह इतरांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच आरोपींनी मुंबईतील काही नागरिकांना गंडा घातला आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी कोल्हापुरात येऊन अटकेतील आरोपींची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.