शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

ऊस दर आंदोलन: पोलिसांचा विरोध झुगारुन कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ने रोखला पुणे-बंगळूरू महामार्ग, वाहनांच्या लांबच लांब रांगा

By विश्वास पाटील | Updated: November 23, 2023 14:02 IST

काही शेतकऱ्यांनी आसूड ओढत सरकारचा निषेध केला

सतीश पाटीलकोल्हापूर : गतवर्षी गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता देण्याच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कोल्हापुरातील पुणे-बंगळूरू महामार्ग रोखला. पोलिसांचा विरोध झुगारुन शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी रात्री स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.मात्र, तरीही या दडपशाहीला विरोध करत हजारो शेतकरी महामार्गावर उतरले. स्वत: राजू शेट्टी यांनीही अंबाबाईचे दर्शन घेऊन चक्काजाम आंदोलनात भाग घेतला. महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.     मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला  १०० रुपये द्या अशी मागणी करत स्वाभिमानीने एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र, तरीही कारखानदार याला दाद देत नसल्याने स्वाभिमानीने  पुणे-बंगळूरू महामार्गावरील पंचगंगा पुलावर चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. तरीही त्यांना चकवा देत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी सरकारविराधोत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी आसूड ओढत सरकारचा निषेध केला.

वाठार  उड्डाणपूलावर  बॅरिकेड लावून वाहतूक बंद किणी : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय  महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सकाळच्या सुमारासच वाठार  तर्फे वडगांव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपूलावर  बॅरिकेड लावून महामार्गावरील वाहतूक पुर्ण बंद केली. यामुळे वाहनांच्या  लांबपर्यंत रांगाच रांगा लागल्या. तर राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस वाठार बसस्थानकावर थांबवण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाhighwayमहामार्ग