शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूजा पवारचे पालकत्व काडसिद्धेश्वर स्वामींकडे

By admin | Updated: July 3, 2015 01:05 IST

शोभेच्या दारूच्या स्फोटातील जखमी : सातारा जिल्ह्यातील मुलगी, वैद्यकीय खर्चासह शिक्षणाचीही जबाबदारी

कोल्हापूर : शोभेच्या दारूच्या स्फोटात जखमी झालेल्या वाई (जि. सातारा) तालुक्यातील ओझर्डे येथील पूजा पवार या मुलीचे पालकत्व येथील कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींनी स्वीकारले आहे. तिचा पुढील वैद्यकीय खर्च, शिक्षण, नोकरी, लग्न यांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींनीच पत्रकारांशी बोलताना गुरुवारी ही माहिती दिली.ओझर्डे येथे ८ एप्रिलला झालेल्या पद्मावती देवीच्या यात्रेच्यावेळी शोभेच्या दारूच्या आतषबाजी वेळी मोठा स्फोट झाला. यात्रेतील अनेक खेळण्याची दुकाने आगीच्या भस्मसात पडली. त्यावेळी खेळण्याच्या दुकानात झोपलेल्या अकरा आणि दहा वर्षांच्या पूजा आणि गीता आगीत गंभीर जखमी झाल्या. लोकांनी त्या मुलींना उपचारासाठी साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल ; पण त्यांच्यावर उपचार करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. वडील रामदास पवार यांची आर्थिक कुवत नाही. खेळणी विकून ते कुटुंब चालवतात. दोनवेळचं पोट भरण्यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू असतो. परिणामी जखमी मुलींवर उपचाराला पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. कोल्हापूरचे मात्र वाईत प्रांताधिकारी असलेले रवींद्र खेबुडकर यांनी माहिती काडसिध्देश्वर स्वामींना सांगितली. स्वामींनी त्वरित दोन्ही मुलींना उपचारासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये आणले. उपचार सुरू असताना गीताचा मृत्यू झाला. पूजा मात्र उपचारास चांगली प्रतिसाद देत राहिली. डॉ. रणजित मिरजे, डॉ. सुधाकर लिमये, डॉ. अमोल मोहिते यांनी विशेष लक्ष देऊन तिच्यावर उपचार केले. तिची प्रकृती चांगली झाली आहे. आतापर्यंतची सर्व सेवा मोफत दिली आहे. या पुढीलही वैद्यकीय खर्च, शिक्षण, नोकरी, लग्न करण्याचे पालकत्व काडसिध्देश्वर स्वामींनी घेतले आहे. (प्रतिनिधी)