वारणा महाविद्यालयाच्या वारणा वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:06+5:302021-04-05T04:21:06+5:30
वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी अंकाचे स्वागत केले. यावेळी संपादक मंडळातील डॉ. एस. एस. जाधव, ...

वारणा महाविद्यालयाच्या वारणा वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन
वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी अंकाचे स्वागत केले. यावेळी संपादक मंडळातील डॉ. एस. एस. जाधव, डॉ. डी. डी. सातपुते, प्रा. बी. डी. आभ्रंगे, डॉ. प्रीती शिंदे-पाटील, प्रा. वर्षा रजपूत आणि डॉ. बी. टी. साळोखे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्यिक होण्यासाठी वारणा वार्षिक नियतकालिकातूनच प्रेरणा मिळेल. तरुणांना सर्जनशील बनवून समाजाचे प्रश्न, गरजा, विचार आणि भावभावना मांडण्यासाठी लिहिते करण्याची गरज असल्याचे आमदार कोरे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी वारणा वार्षिक अंकास या पूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाची सातत्याने अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत, असे सांगून शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत याही वर्षी ‘वारणा’चा अंक अव्वल स्थान प्राप्त करील, असा विश्वास व्यक्त केला. संपादक डॉ. एस. एस. जाधव यांनी आभार मानले.
फोटो ओळ- वारणा महाविद्यालयाच्या ‘वारणा’ वार्षिक नियतकालिक अंकाचा प्रकाशन सोहळा वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर उपस्थित होते.