पेन्शनसाठी लागणारे उत्पन्न दाखले त्वरित द्या * जनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:57+5:302021-02-05T07:02:57+5:30

शिरोळ : श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी लागणारे उत्पन्न दाखले त्वरित मिळावेत, अशा मागणीचे निवेदन अखिल ...

Provide income proof for pension immediately * Janwa | पेन्शनसाठी लागणारे उत्पन्न दाखले त्वरित द्या * जनवा

पेन्शनसाठी लागणारे उत्पन्न दाखले त्वरित द्या * जनवा

शिरोळ : श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी लागणारे उत्पन्न दाखले त्वरित मिळावेत, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयास दिले आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांनी स्वीकारले. पेन्शन अर्जातील वार्षिक उत्पन्नाचे दाखले देण्याबाबत त्रुटी काढण्यात आल्या आहेत. २४ मार्चपासून कोरोनामुळे दाखले मागणीचे अर्ज तहसील कार्यालयात घेतले गेलेले नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे दाखले मिळालेले नाहीत. त्यामुळे संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेची प्रकरणे उत्पन्न दाखल्यांअभावी त्रुटीमध्ये काढलेली आहेत. त्यामुळे उत्पन्न दाखले लवकरात लवकर देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनावर आक्काताई कोळी, कल्पना जगदाळे, ईब्राहिम शेख, हणमंता महिपती, दादासो पोरे, सुभद्रा गुरव, लक्ष्मी लाटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - शिरोळ येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आले.

Web Title: Provide income proof for pension immediately * Janwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.