राष्ट्रीय विरोध दिन : गडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:54 IST2021-07-15T17:48:06+5:302021-07-15T17:54:09+5:30
tahsildar office gadhinglaj kolhapur: केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छातीवर काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली.आंदोलनात अशोक पाटील, लखन खाडे, अमित पाटील, मनिषा निकम, सुरेश बारामती, प्राजक्ता पाटील, रमेश कवठणकर आदी सहभागी झाले होते.
गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छातीवर काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
जीएसटी संकलनातील महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे ४० हजार कोटी तात्काळ राज्याकडे वळती करावेत, कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे मागे घ्यावेत, सरकारी क्षेत्रातील आस्थापनांचे अविवेकी खाजगीकरण थांबवावे, राज्यातील लाखो रिक्त पदे तातडीने भरावीत, सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी आणि अनुज्ञेय आर्थिक मदत तात्काळ द्यावी, सर्वांचे मोफत लसीकरण करावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.
आंदोलनात निवासी नायब तहसिलदार अशोक पाटील, लखन खाडे, अमित पाटील, मनिषा निकम, सुरेश बारामती, प्राजक्ता पाटील, रमेश कवठणकर आदी सहभागी झाले होते.