दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:20 IST2021-03-30T19:09:48+5:302021-03-30T19:20:37+5:30
Forest Dpartment Kolhapur- मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैगिंक छळ विरोधी विशाखा समित्या स्थापन करा या मागण्यासाठी मंगळवारी रमण मळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने निदर्शने केली. योग्य कार्यवाही न झाल्यास पाच एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने
कोल्हापूर : मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैगिंक छळ विरोधी विशाखा समित्या स्थापन करा या मागण्यासाठी मंगळवारी रमण मळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने निदर्शने केली. योग्य कार्यवाही न झाल्यास पाच एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.
दिपाली चव्हाण हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे. कोल्हापुरातही फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने मंगळवारी प्रादेशिक वनसंरक्षण क्लेमेट बेन यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या या निवेदनात या आत्महत्येची उच्चस्तरीय विभागीय स्तरावरील चौकशी करुन दोषीवर कारवाई करा अशी प्रमुख मागणी केली आहे.
परिक्षेत्र वनअधिकारी व असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महेश झांझुर्णे. युवराज पाटील, सुनील सोनवले, प्रियांका दळवी, संतोष चव्हाण, सचिन डोंबाळे या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.