शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

Kolhapur: बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी धरणे आंदोलन

By संदीप आडनाईक | Published: January 15, 2024 3:54 PM

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजल्यापासून ...

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजल्यापासून गारगोटी येथील ज्योती चौकातून बाळुमामा देवस्थान संरक्षक धरणे आंदोलनास प्रारंभ होणार असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. देवस्थान बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात द्यावे अशीही मागणी सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिति आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने सोमवारी केली.लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमले आहे. पण या प्रकरणाचे निमित्त करुन मंदिराचे सरकारीकरण करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्याचे सरकारीकरण न करता जे माजी विश्वस्त दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी पण देवस्थान भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी कृती समितीने केली आहे. यापूर्वी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तुळजाभवानीचे मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाईचे मंदिर, मुंबईतील सिध्दिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साई संस्थानासह राज्यातील अनेक मंदिराचे सरकारीकरण झाले, पण त्या सरकारी समित्यांमध्ये भूमी, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यावधीचे घोटाळे उघडकीस येत आहेत. जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करतात, त्यांच्याकडेच मंदिराची व्यवस्था देणे म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या देण्यासारखे आहे, म्हणून या सरकारीकरणाला विरोध असल्याचे समितीने म्हटले आहे. यावेळी बाळूमामा हालसिध्दनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष निखिल मोहिते, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समितीचे समन्यवयक बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंagitationआंदोलन