भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:32 IST2019-08-20T17:28:16+5:302019-08-20T17:32:00+5:30

विडंबनात्मक भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राज्य सरकारचा निषेध केला. राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे.

Protest of the government through hymns; Non-subsidized school action committee movement | भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन

कोल्हापुरात विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने भजन-किर्तनाचे अनोखे आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देभजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : विडंबनात्मक भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राज्य सरकारचा निषेध केला. राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे.

येथील कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षक पांडुरंग पाटील, नारायण पारखे, सचिन कांबळे, उत्तम जाधव यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी याठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मंगळवारी भजन-किर्तनाचे अनोखे आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

यावेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, प्रेमकुमार बिंदगे, शाहीर राजू भोरे, नेहा भुसारी, गौतमी पाटील, बी. जी. पाटील, आदी उपस्थित होते. 


 

 

Web Title: Protest of the government through hymns; Non-subsidized school action committee movement