मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी दुबईतील मराठा रहिवाशांचे धरणे
By संदीप आडनाईक | Updated: December 23, 2023 19:16 IST2023-12-23T19:16:09+5:302023-12-23T19:16:34+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने दुबईत शनिवारी मराठा ...

मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी दुबईतील मराठा रहिवाशांचे धरणे
कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने दुबईत शनिवारी मराठा समाजातील रहिवाशांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून दुबईतील जबील पार्क येथे परवानगी घेउन शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये दुबईतील मराठा बांधवही सहभागी झाले. कोल्हापूरातील राजीव लिंग्रज वैयक्तिक कामासाठी दुबईत आहेत. त्यांनी प्रथम जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची कल्पना दिली. त्यानंतर दुबईतील मराठा बांधवांनी हे आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, मराठा आरक्षणाचे टी शर्ट, भगवा झेंडा, फलक घेउन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दुबई येथील रघुनाथ सगळे, अभिजित देशमुख, संदीप कड, अमोल डुबे पाटील, विक्रम भोसले, श्रेयस पाटील, मुकूंद पाटील, अनिल थोपटे पाटील, दीपाली डाके सहभागी झाले होते.