शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

वार्षिक परीक्षांसाठीचा प्रस्ताव देणार, विद्यापीठ विकास मंचची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:31 IST

शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देवार्षिक परीक्षांसाठीचा प्रस्ताव देणार, विद्यापीठ विकास मंचची मागणी दुबार प्रमाणपत्र छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.मेहता म्हणाले, विद्यापीठाचा शैक्षणिक, संशोधनात्मक विकास हे विद्यापीठ विकास मंचचे ध्येय आहे. त्यासाठी मंचने विविध रचनात्मक सूचना, ठराव विद्यापीठात सादर केले आहेत. पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये खेळाडूंसाठी वैद्यकीय विमा सुविधा, मुलींच्या वसतिगृहात अद्ययावत सोयीसुविधा असाव्यात, सांगली व सातारा येथे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, आदींचा समावेश आहे.

गायकवाड म्हणाले, दुबार प्रमाणपत्र छपाई प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला, तर मंच त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. अधिसभा सदस्य दिनेश जंगम म्हणाले, प्राध्यापकांचे विविध प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी छात्र संसद, खुल्या निवडणुका आगामी शैक्षणिक वर्षात घेण्यात याव्यात, अशी मागणी मंचने केली आहे. या पत्रकार परिषदेस अधिसभा सदस्य आरती शिंदे उपस्थित होत्या.

प्रस्तावासाठी समितीची स्थापनाविद्यापीठात कला, वाणिज्य शाखेसाठी पुन्हा वार्षिक परीक्षा पद्धती कशा पद्धतीने राबविता येईल; त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) कशी मान्यता घेता येईल, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंचने समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. या समितीद्वारे प्रस्ताव तयार करून तो विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. अन्य मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर