वाहतूक कोंडी; कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव - महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:50 IST2025-01-22T16:49:22+5:302025-01-22T16:50:16+5:30
कोल्हापूर : शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल ...

वाहतूक कोंडी; कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव - महाडिक
कोल्हापूर : शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. यासंबंधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शहर वाहतूक आदी विभागांच्या समन्वयाने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार महाडिक यांनी महापालिकेत प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासोबत विविध विषयांसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार महाडिक म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील रस्ते करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून आणखी निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निधीतून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे गतीने होतील.
महापालिका मुख्य इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विविध निधी उपलब्ध केला जाईल. शेजारच्या गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा संकलनासाठी जागा नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून नव्या जागेचा शोध घेतला जाईल.