शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सम्राट कोराणेकडून फरार काळात कोट्यवधींची मालमत्ता खरेदी, पैसे आणले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:45 IST

फरार काळात अनेकांच्या संपर्कात, मोबाइल सिम कोणी पुरवले?

कोल्हापूर : मटका बुकी सम्राट कोराणे याने फरार काळात नागाळा पार्क परिसरात पत्नीच्या नावे फ्लॅटची खरेदी केली, तसेच साळशिरंबे (ता. कराड, जि. सातारा) येथे पाच एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. साथीदारांनी त्याला वेळोवेळी १६ लाख ५० हजार रुपये पाठवले. त्यानेही काही साथीदारांना हवाला आणि कुरिअरद्वारे पैसे पाठवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. त्यानुसार दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.सहा वर्षे पोलिसांना चकवा दिल्यानंतर स्वत:हून न्यायालयात हजर झालेला मटका बुकी सम्राट कोराणे याची १२ दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्याला पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर करून कोठडी वाढवून मागितली. यावेळी सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी गेल्या १२ दिवसांतील तपासाची माहिती न्यायाधीशांना सांगितली. फरार काळात कोराणे याने पत्नीच्या नावे नागाळा पार्क येथे दोन बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर कराड तालुक्यात साळशिरंबे गावात पाच एकर शेतजमीन खरेदी केली.हवाला आणि कुरिअरच्या माध्यमातून त्याने काही साथीदारांना सुमारे ५० ते ६० लाखांची रक्कम पाठवली आहे. त्यालाही काही साथीदारांनी आर्थिक मदत केली. याचा तपास करण्यासाठी अजून पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद ॲड. महाडेश्वर यांनी केला. त्यानुसार न्यायाधीश कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली.

घरात सापडल्या जुन्या नोटाआठवड्यापूर्वी पोलिसांनी कोराणे याच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेतली. त्यावेळी एकूण ६८ हजार ८०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये २३ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या, तसेच दोन ते तीन मालमत्तांची कागदपत्रे मिळाली, अशी माहिती वकिलांनी दिली.

पैसे आणले कुठून?फरार काळात कोराणेचे अवैध धंदे बंद होते, असा पोलिसांचा दावा होता. त्याची बँक खाती गोठवल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. तरीही त्याने कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या. यासाठी पैसे कुठून आणले, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल सिम कोणी पुरवले?फरार काळात कोराणे अनेकांच्या संपर्कात होता. यासाठी त्याने कोणाच्या नावावर मोबाइल सिम घेतले? आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी कोणाच्या बँक खात्यांचा वापर केला? रोख स्वरूपात कोणी मदत केली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोघांकडून मिळाले साडेसोळा लाखअटकेतील विजेंद्र ऊर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे यांनी गेल्या चार वर्षांत कोराणे याला १६ लाख ५० हजार रुपये पाठवले आहेत. ही रक्कम या दोघांना कोणाकडून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस