पुलवामा घटनेचा सराफ संघाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:34 IST2019-02-16T14:33:46+5:302019-02-16T14:34:04+5:30
जम्मु-काश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ४० हून अधिक जवान बळी गेले. या घटनेचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शनिवारी निषेध करण्यात आला.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने शनिवारी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भरत ओसवाल, कुलदीप गायकवाड, माणिक जैन, विजय हावळ आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : जम्मु-काश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ४० हून अधिक जवान बळी गेले. या घटनेचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शनिवारी निषेध करण्यात आला.
याबाबतची सभा अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रथम शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक जितेंद्र राठोड, किरण गांधी, संजय चोडणकर, रवींद्र राठोड, नितीन ओसवाल, तर सभासद बन्सीधर चिपडे, नंदकुमार ओसवाल, अशोक ओसवाल, मनोज राठोड, सुहास जाधव, केशव आडसुळे, अजय जैन, व्यंकटेश सोनार यांच्यासह सर्व सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी या घटनेच्या निषेर्धात सकाळी दहा ते दुपारी बारा या दरम्यान सर्व सराफ व्यापारी आपली दुकाने बंद करून गुजरी कॉर्नर येथे शहीद जवानांना आदरांजली वाहणार आहेत.