शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या

By admin | Updated: August 30, 2015 23:39 IST

अज्ञाताने गोळ््या घातल्या

धारवाड /बेळगाव : मूर्तीपूजेविरुद्ध जनजागृती अभियान सुरू केलेले कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही साहित्यिक डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे तीन मुले आणि एक मुलगी आहे.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या झाल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. त्याच पद्धतीने कलबुर्गी यांच्यावरही हल्ला झाला. धारवाडमधील कल्याणनगर परिसरात कलबुर्गी यांचे निवासस्थान आहे. रविवारी सकाळी दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर कलबुर्गी यांच्या घरी आले. त्यापैकी एकजण दुचाकीवर थांबला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी कलबुर्गी यांचे कपाळ भेदून आरपार गेली, तर दुसरी गोळी शरीरात घुसली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी लगेचच दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यानंतर कलबुर्गी यांना तत्काळ धारवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरक्षा परत केली डॉ. कलबुर्गी यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवली होती. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी कायम त्यांच्यासोबत राहत होते. पण काही दिवसांपूर्वी डॉ. कलबुर्गी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या सुरक्षेसाठी सरकारच्या पैशांचा अपव्यय होत आहे; त्यामुळे सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या आधारे पोलीस प्रशासनाने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. (प्रतिनिधी)बजरंग दलाचे वादग्रस्त टिष्ट्वटबजरंग दलाच्या भुवंत शेट्टी याने टिष्ट्वटरवर कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन केले असून, हिंदुत्वाच्या विरोधात लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यांची हीच गत होईल, अशी धमकीही दिली आहे.