भेडसगाव पतसंस्थेला १ कोटी ३५ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:01+5:302021-04-06T04:23:01+5:30
पाटील म्हणाले, यंदाच्या ठेवीमध्ये १०.३२ टक्के वाढ होऊन एकूण ठेवी १०४ कोटी ५३ लाख झाल्या आहेत. कर्ज ...

भेडसगाव पतसंस्थेला १ कोटी ३५ लाखांचा नफा
पाटील म्हणाले, यंदाच्या ठेवीमध्ये १०.३२ टक्के वाढ होऊन एकूण ठेवी १०४ कोटी ५३ लाख झाल्या आहेत. कर्ज वाटपामध्ये १०.७७ टक्के वाढ होऊन ७४ कोटी २३ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. चालू वर्षात जागतिक महामारी कोरोना प्रादुर्भावामुळे ठेवीवर व कर्ज वसुलीवर परिणाम झाला आहे, तरीही संस्थेने १०० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कर्जवसुली ९५% केली असून संस्थेचा नेट एनपीए ० टक्के आहे. संस्थेच्या एकूण व्यवसाया मध्ये १०.८८% नी वाढ होऊन एकूण ठेवी १०४.५२ कोटी व ७४.२३ कोटी कर्ज असा १७८.७५ कोटींचा व्यवसाय संस्थेने केला आहे. संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ३९.३२ % म्हणजेच ४१.१० कोटी इतकी गुंतवणूक इतर बँकांत केली आहे. पुढील वर्षात संस्था १२५ कोटी ठेवीचा टप्पा पार करण्याचा मानस आहे. संस्थेचे भाग भांडवल व निधी १२ कोटी ९६ लाख असून सभासदांना १० टक्के लाभांश प्रतिवर्षी दिला जातो. मयत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत, आजारी सभासदांना मदत निधी, संस्थेतील कर्मचारी व सभासद यांना ३ लाखांचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखाचा विमा संस्थेने उतरला असून हा नावीन्यपूर्ण उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून संस्थेने राबवला असल्याचेही हंबीरराव पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन पांडुरंग डांगे, भेडसगावचे सरपंच अमरसिंह पाटील, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
०५ हंबीरराव पाटील