शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सजवलेल्या रथातून भगवान महावीरांची मिरवणूक

By संदीप आडनाईक | Updated: April 10, 2025 20:19 IST

विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझीम पथक, भव्य पंचरंगी ध्वजाद्वारे जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते.

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ‘महावीर भगवान की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘अहिंसा परमो: धर्म की जय..’ असा जयघोष, रथात फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची मूर्ती, ‘जगा आणि जगू द्या, पर्यावरण वाचवा, वन्यप्राण्यांचे संरक्षण करा, पाणी वाचवा’ असे संदेश देणाऱ्या विविध जिन मंदिरांच्या चित्ररथासह मिरवणुकीने सुरुवात झाली. यात विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझीम पथक, भव्य पंचरंगी ध्वजाद्वारे जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते.

भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त जैन समाजातर्फे महावीर जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गंगावेश येथील मानस्तंभ जिन मंदिरात सकाळी भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर महावीर जन्मकाळ सोहळ्यानंतर प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत सागर कमते यांच्या हस्ते पालखी आणि चांदीच्या रथाच्या पूजन झाले. त्यानंतर रथोत्सव मिरवणुकीस पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जिन मंदिर गंगावेश येथून सुरुवात झाली. भेंडे गल्ली, भाऊसिंगजी रोड, राजाराम रोड, जेल कमान, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, लक्ष्मी रोड, अयोध्या टॉकीजमार्गे दसरा चौकातील दिगंबर जैन मंदिर येथे मिरवणूक विसर्जित झाली.

आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम, महेश जाधव यांनी रथोत्सवात भाग घेतला. रक्तदान शिबिरात धर्मानुरागी श्रावकांनी रक्तदान केले. चांदीच्या रथात बसण्याचा आणि पांडूकशिलेवर पंचामृत पूजेचा मान सविता आणि अमर भवनेंद्र उपाध्ये परिवारास मिळाला. वात्सल्य भोजन मंडपाचे उद्घाटन अक्षय कमते आणि परिवाराच्या हस्ते झाले. महावीरांची अभिषेक, पूजा आणि आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप झाले.

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंती