Shahu Maharaj Jayanti : शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमास प्रियाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:58 IST2021-06-22T12:53:30+5:302021-06-22T12:58:29+5:30

Shahu Maharaj Jayanti kolhapur : कोरोना काळात शववाहिकेवर काम करत तब्बल १०८ शव स्मशानभूमीपर्यंत पोहोच करणाऱ्या येथील प्रिया पाटील यांच्या कामाची दखल शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी घेतली. त्यांनी प्रियाला येत्या २६ जूनला होणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्या निमंत्रणाचा मान दिला. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले.

Priya invited to Shahu Maharaj Janmotsav program | Shahu Maharaj Jayanti : शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमास प्रियाला निमंत्रण

कोल्हापुरातील प्रिया पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्या निमंत्रणाच्या मानाचे पत्र समरजीत घाटगे यांनी दिले.

ठळक मुद्देकोरोना काळात शववाहिकेवर काम करणाऱ्या प्रियाला शाहू जन्मोत्सवाचे निमंत्रणयेत्या २६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव

कोल्हापूर : कोरोना काळात शववाहिकेवर काम करत तब्बल १०८ शव स्मशानभूमीपर्यंत पोहोच करणाऱ्या येथील प्रिया पाटील यांच्या कामाची दखल शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी घेतली. त्यांनी प्रियाला येत्या २६ जूनला होणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्या निमंत्रणाचा मान दिला. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले.

यावेळी शाहूंच्या जनक घराण्याचा वारस म्हणून बहुजनांसाठी काम करणाऱ्या प्रियाचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि म्हणूनच येत्या २६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये प्रिया यांनाच पहिल्या निमंत्रणाचा मान दिल्याचे घाटगे यांनी सांगितले.
 

Web Title: Priya invited to Shahu Maharaj Janmotsav program