शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

खासगी सावकारांभोवती फास आवळणार : गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:49 AM

राजारामपुरी येथील नारायण जाधव यांच्याकडे २७ लाख रुपयांची रोकड व तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. इतर सावकारांकडे ३० कोरे धनादेश, जमीन व मालमत्तांचे २४ खरेदीदस्त, सहा संचकार पत्रे, ४३ बॉँड सापडले.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक ; रूपेश सुर्वेची कसून चौकशी; सोमवारी अंतिम अहवाल

कोल्हापूर : जिल्हा उपनिबंधकांनी गुरुवारी (दि. १२) कारवाई केलेल्या खासगी सावकारांपैकी काहींची शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. रूपेश सुर्वे यांची चौकशी पूर्ण झाली असून आज, शनिवार व सोमवारी (दि. १६) उर्वरित लोकांची चौकशी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सकृत्दर्शनी दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार असून, ज्यांच्या चौकशीत अस्पष्टता आहे, त्यांची साहाय्यक निबंधकांमार्फत फेरचौकशी केली जाणार आहे.

खासगी सावकारांकडून पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी गुरूवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह मुरगूड, चिमगाव, कूर, मुदाळ, गंगापूर, गारगोटी, राधानगरी येथील विनापरवाना सावकारी करणा-या १२ जणांच्या कार्यालये व घरांवर छापे टाकले. यामध्ये लाखो रुपयांच्या रोकडीसह मुद्देमालही सापडला. राजारामपुरी येथील नारायण जाधव यांच्याकडे २७ लाख रुपयांची रोकड व तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. इतर सावकारांकडे ३० कोरे धनादेश, जमीन व मालमत्तांचे २४ खरेदीदस्त, सहा संचकार पत्रे, ४३ बॉँड सापडले.

शुक्रवारी सहकार विभागाने संबंधितांविरोधात पुढील कार्यवाही सुरू केली. यामध्ये रूपेश सुर्वे यांची कसून चौकशी केली. उर्वरित लोकांची सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करून त्याच दिवशी सायंकाळी अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. अहवालात दोषी आढळलेल्यांवर नियमबाह्य सावकारी केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

छुपे रुस्तम धास्तावले!ज्यांच्याबाबत तक्रारी आल्या त्यांच्यावरच छापे टाकण्यात आले. मात्र अजूनही छुपे रुस्तम असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी दिवसभर अनेक सावकार गायब झाले होते.खासगी सावकारांनी कागदोपत्री व्याजदर एक दाखविला असला तरी अनेकांकडून दुप्पट व्याजदराने वसुली केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत पुढे येत आहे. या व्याजदराला अनेकजण बळी पडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितलेछाप्यामध्ये जे स्टॅम्प सापडले त्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले आहे. कोºया स्टॅम्प पेपरवर सह्या घेता येतात का? त्या स्टॅम्पची मुदत किती वर्षे असते? याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती सहकार विभागाने संबंधित विभागाकडे केली आहे.

चौकशीतील प्रश्नावली

  • दुसऱ्याच्या नावावरील स्टॅम्प तुमच्याकडे कसे?
  • इतरांच्या मालकीच्या मालमत्तांची कागदपत्रे तुमच्याकडे कशी?
  • किती लोकांना पैसे दिले, त्यांचा व्याजदर काय लावला?
  • किती वर्षांपासून सावकारी करता?

 

खासगी सावकारांकडे चौकशी सुरू झाली असून, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. संबंधित इतर शासकीय विभागांचे याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे साधारणत: सोमवारी सायंकाळपर्यंत अहवाल येईल.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीMONEYपैसा