शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी परिसरातील समस्यांकडे प्राधान्याने लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहर व परिसरातील गावांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहर व परिसरातील गावांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करून संपूर्ण परिसराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आगामी काळात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू जयवंतराव आवळे यांनी केले.

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसिंगराव देसाई होते. यावेळी पैसाफंड बँक ते भेंडवडे गल्ली रस्ता कामासाठी १५ लाख रुपये, हुपरी ते तळंदगे रस्ता कामासाठी १० लाख रुपये, गंगानगर वसाहतीतील रेणुका मंदिरातील फरशी व रस्ता काॅंक्रिटीकरण कामासाठी १० लाख रुपये अशा एकूण ३५ लाख रुपयांच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.

आमदार आवळे म्हणाले, या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची तालुक्यात जाण्यासाठी होणारी ससेहोलपट दूर करण्यासाठी हुपरी शहरात जनसंपर्क कार्यालय उघडले आहे. याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा मी आमदार असून, नागरिकांच्या शासकीय पातळीवरील अडीअडचणी सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात आठवड्यातून किमान दोनवेळा उपस्थित राहणार आहे.

मानसिंगराव देसाई म्हणाले, आमदार राजू आवळे यांनी आमदारपदाला साजेशी कामगिरी करत अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा जनमानसात उमटवला आहे. संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजना राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे.

यावेळी हातकणंगले तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष लालासाहेब देसाई, उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, राजेंद्र होगाडे, रामचंद्र कीर्तीकर, अनिल धोंगडे, धर्मवीर कांबळे, चंद्रकांत परकारे, उदय कंगणे, अँड. संदीप कदम, शाहू म्हत्रे, शब्बीर जमादार, रमजान घुडुभाई, अशोक बल्लोळे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक लालासाहेब देसाई यांनी केले. सूत्रसंचालन कबीर आळतेकर यांनी केले तर उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

फोटो ओळी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार राजू आवळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानसिंग देसाई, रामचंद्र कीर्तीकर, लालासाहेब देसाई, बाबासाहेब गायकवाड, राजेश होगाडे आदी उपस्थित होते.