कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. शिल्पा कोठावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:43+5:302020-12-24T04:21:43+5:30
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. सुधाकररावजी कोरे महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ...

कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. शिल्पा कोठावळे
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. सुधाकररावजी कोरे महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. शिल्पा नितीन कोठावळे यांची निवड झाली.
महात्मा गांधी मेडिकल समुहाचे प्रमुख व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकरराव कोरे यांचे निधन झाल्याने जागा रिक्त झाली होती. अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. सचिव विद्याधर कांबळे यांनी विषयवाचन केले. संचालक भगवान पाटील यांनी डॉ. कोठावळे यांचे नाव सुचविले. त्यास अशोक पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण कुंभार, संचालक भगवान पाटील, अशोक पाटील, सुधीर जाधव, पांडुरंग वाघमोडे, धोंडिराम भाळवणे, हेमलता पोवार, महेश घेवारी उपस्थित होते. तानाजी गराडे यांनी आभार मानले.
फोटो :डॉ. शिल्पा कोठावळे