शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, सचिवांना पॅनकार्ड सक्ती

By admin | Updated: September 1, 2015 00:20 IST

गणेशोत्सव : मंडळांच्या वर्गणीच्या गैरवापराला चाप बसणार

आनंद पाटील - कोल्हापूर  सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, इतर तसेच धर्मादाय कार्यासाठी गोळा केलेल्या वर्गणीचा योग्य विनियोग होत नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवापासून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी खर्चाला चाप बसणार आहे. यासाठी अध्यक्ष व सचिवांना आपले पॅनकार्ड तसेच अन्य ओळखपत्र धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीप्रसंगी देणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. मंडळाने पाच हजार रुपयांवरील खर्चाचे सादरीकरण चार्टर्ड अकौंटंटच्या माध्यमातून सादर करणे गरजेचे आहे.सार्वजनिक गणेश, नवरात्रोत्सव तसेच धार्मिक कार्यासाठी राज्यात सर्वत्र भरमसाट देणग्या गोळा केल्या जातात; मात्र ज्या कारणासाठी देणग्या गोळा केल्या जातात त्यासाठी त्याचा विनियोग होत नसल्याचे सर्वश्रुत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेने असाच मदतनिधी गोळा केला होता. मात्र, त्याचा विनियोग स्वत:च्या स्वार्थासाठी किंबहुना वेगळ्याच कारणासाठी केला. त्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्याचा निकाल गेल्या एप्रिल महिन्यात लागला. यामध्ये उच्च न्यायालयाने संबंधित संस्थेने देणग्यांचा विनियोग योग्य कारणासाठी केला नसल्याचे अधोरेखित केले आहे. निधीचा गैरवापर टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने संबंधित मंडळाचे अध्यक्ष व सचिवाला जबाबदार धरण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५०चे कलम ४१ (क) अन्वये मंडळाने परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये मंडळाच्या अध्यक्ष व सचिवाने स्वयंघोषणापत्र, पॅनकार्ड तसेच आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, आदी ओळखपत्रांची छायांकित प्रत देणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे खरी असून, काही गैर अथवा चुकीचे आढळल्यास तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अध्यक्ष या नात्याने माझी असेल, असे प्रतिज्ञापत्र देणे आता आवश्यक आहे.गतवर्षीचे हिशेबपत्रक व यंदाचे अंदाजपत्रक सादर करणे मंडळांना बंधनकारक आहे. धर्मादाय आयुक्त यांच्याकडील नोंदणीसाठी यापूर्वीच्या परवानगी पत्राची छायांकित प्रत दाखवावी. मंडळ प्रथमच परवानगी मागत असेल तर नगरसेवक अथवा ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आणणे बंधनकारक आहे. दरवर्षी जिल्ह्यात दोन हजार मंडळांची नावनोंदणी होते. यंदा १९ आॅगस्टपासून परवानगीसाठी नावनोंदणी सुरूझाली आहे. पाच हजार रुपयांवरील खर्चाचे सादरीकरण चार्टर्ड अकौंटंटद्वारे करणे बंधनकारकवर्गणीद्वारे गोळा केलेल्या निधीचा वापर त्याच कारणासाठी करणे आवश्यकअनुचित प्रकार घडल्यास त्यास अध्यक्ष जबाबदारगतवर्षीचे हिशेबपत्र व यंदाचे अंदाजपत्रक सादर करणे गरजेचे