कोल्हापुरात पावसाची हजेरी, नोकरदार मंडळींची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 17:29 IST2018-06-04T17:29:29+5:302018-06-04T17:29:29+5:30
दिवसभरच्या कमालीच्या उष्म्यानंतर सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली.

कोल्हापुरात पावसाची हजेरी, नोकरदार मंडळींची धांदल
कोल्हापूर : दिवसभरच्या कमालीच्या उष्म्यानंतर सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली.
दिवसभर शहरामध्ये उष्मा जाणवत होता. दुपारी चारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. विजाही चमकत होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळींचीही धांदल उडाली.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापुरकरांवर सायंकाळी पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहर मध्यवस्तीतील काही पेठा आणि उपनगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
जिल्ह्यातील बहुतांश भागातही पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली.