शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वातावरणात गारवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:19 IST

आजपासून रोज हजेरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. रात्रीपर्यंत पावसाची एकसारखी भुरभुर राहिली, मान्सून सुरू झाल्यासारखेच वातावरण राहिल्याने गारवा निर्माण झाला होता. आज, गुरुवार पासून पाऊस रोज हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.यंदा मान्सून देव भूमीत लवकर दाखल झाला आहे. त्याचा महाराष्ट्राकडे आगेकूच करण्याचा वेग चांगला असल्याने मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण राहिले. त्यानंतर एकदम तापमानात वाढ झाली आणि अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. दुपारनंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले, दुपारी दीड वाजता कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर थोडा वेळ उसंत घेतली, साडेपाच नंतर पुन्हा पावसाची भुरभुर सुरू झाली. मान्सूनच्या आगमनासारखे वातावरण राहिले. आजपासून आठ दिवस पावसाची रोज हजेरी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.शेतकऱ्यांची तारांबळ..दुपारनंतर मान्सून सुरू झाल्या सारखे वातावरण झाले. त्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला तर त्यानंतर भुरभुर सुरू झाल्याने पाऊस सुरुच झाला म्हणून शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.तापमान २८ डिग्रीपर्यंतयंदा कमाल तापमानाने उच्चांक गाठला हाेता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानात घट झाली. बुधवारी २८ डिग्रीपर्यंत राहिले.कुंभी-कासारी परिसरात दीड तास मुसळधार पाऊसकोपार्डे : ढगाळ वातावरण असूनही दोन दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व हवेत प्रचंड उष्णता होती. कुंभी कासारी परिसरात दुपारी साडेबारा वाजता पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास मुसळधार पाऊस झाला.कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजारी लावली होती. कुंभी-कासारी परिसरात मात्र एक-दोन वेळा हलका पाऊस झाला होता. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण व हवेतील उष्णता यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुपारी साडेबारा वाजता पावसाच्या हलक्या सरींना सुरवात झाली. यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास हा पाऊस कोसळत होता. कुणबी कासारी परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आजच्या मुसळधार पावसाने भाताची धूळवाफ पेरणी झालेल्या क्षेत्राबरोबर ऊसाच्या पिकालाही त्याचा फायदा झाला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मात्र लोकांची तारांबळ उडाली.पन्हाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्रीपोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पेरणी केलेल्या भात पिकांची उगवण आणि ऊस पिकांच्या पोषक वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण. तर कुठे तुरळक पावसाची पडल्याने भात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.यंदा पाऊस चांगला लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी मान्सूनपूर्व पावसाने पेरणीच्या पूर्वसंध्येला दिलेली हुलकावणी शेतकरी चिंता वाढविणारी होती. जेथे शक्य असेल तेथील शेतकऱ्यांनी पाटाने पाणी देऊन भाताची उगवण करून घेतली आहे. तालुक्यातील डोंगर माथ्यावरील आणि माळामुरडाच्या शेतातील पेरणीस पावसाची गरज होती. त्याची उणीव बुधवारी पडलेल्या दमदार पावसाने भरून काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी उसाला रासायनिक खताचा मिरगी डोस टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे.विजांसह कडकडाटासह पावसाने हलकर्णीकरांची तारांबळहलकर्णी : दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हलकर्णीकरांची तारांबळ उडाली. बुधवारी हलकर्णीच्या बाजाराच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी व बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांचा भाजीपालाही वाहून गेला. तासाभरानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, संध्याकाळी पाचपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.हलकर्णीच्या मुख्य ओढ्यावर पाणी आल्याने हलकर्णी बसर्गे रस्ता सुमारे तासभर बंद होता. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. हलकर्णीसह परिसरातील हा पाऊस जोरदार झाल्याने ओढ्यास पाणी आल्याचे सांगण्यात येत होते. मुख्य बाजारपेठेतील पाणी साचून राहिल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने हलविली. गावातील मुख्य रस्ता रस्त्याच्या बाजूच्या अनेक गटारी तुंबल्याने येथील तेरणी रस्त्यावरील ओढ्याप्रमाणेच पाणी वाहत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस