शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:35 IST

महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देजागतिक बॅँकेकडे अर्थसाहाय्याची मागणी होणार १२ सप्टेंबरला जागतिक बॅँके चे प्रतिनिधी कोल्हापुरात येणार

प्रवीण देसाई कोल्हापूर : महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. १२ व १३ सप्टेंबरला जिल्ह्यात जागतिक बॅँकेचे प्रतिनिधी येत आहेत. त्यांच्यासमोर अर्थसाहाय्याकरिता याचे सादरीकरण केले जाणार आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने जिल्ह्यात हाहाकार माजला होता. ३५० हून अधिक गावे पूरबाधित झाली होती. त्यांमध्ये शिरोळ तालुक्यातील १८, हातकणंगलेतील पाच, करवीरमधील चार गावे व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क असा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.

या ठिकाणांची परिस्थिती भीषण होती. गावातील रस्त्यांबरोबरच गावातून इतर गावांसह शहरी भागाला जोडले जाणारे पर्यायी रस्तेही पाण्याखाली गेले होते. या ठिकाणी उड्डाणपूल असते तर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाता आले असते. या विचारातून जिल्हा प्रशासनाने या २७ गावांसह कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्याकरिता थेट जागतिक बॅँकेकडून अर्थसाहाय्य मागण्याची तयारी सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याकरिता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे.गेल्या आठवड्यात दिल्ली येथे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त भागांतील नुकसानीची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर १२ व १३ सप्टेंबरला कोल्हापुरात जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल होणार आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्यासमोर पूरबाधित भागाचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये उड्डाणपुलांकरीता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.पूरबाधित २७ गावांसह कोल्हापूर शहराचा विचारउड्डाणपुलासाठी शिरोळ तालुक्यातील १८ गावांसह हातकणंगले तालुक्यातील पाच, करवीर तालुक्यातील चार व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क, आदी परिसरांचा विचार सुरू आहे.

जनावरांसाठी सुरक्षित तळउड्डाणपुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच गावांमधील गाई, म्हशी अशा पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात आहे. त्यांच्यासाठी उड्डाणपुलांना जोडले जातील अशा पद्धतीने जनावरांचे सुरक्षित तळही उभे करण्याचा विचार आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागWorld Bankवर्ल्ड बँक