शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Navratri -अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:54 PM

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था अशा सर्व संबंधित यंत्रणांची जणू लगीनघाई सुरू आहे. दुसरीकडे, अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.

ठळक मुद्देअंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात यंत्रणांची घाई : विद्युत रोषणाईने झळाळी

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था अशा सर्व संबंधित यंत्रणांची जणू लगीनघाई सुरू आहे. दुसरीकडे, अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.शारदीय नवरात्रौत्सवाला उद्या, रविवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त अंबाबाई मंदिरातील तयारीला आता वेग आला आहे. मुंबईच्या संजय मेंटेनन्सकडून सुरू असलेली स्वच्छता आज, शनिवारी पूर्ण होणार आहे. नवरात्रौत्सवात अंबाबाईची पूजाआद्य शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या विविध रूपांत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते रोजच्या धार्मिक विधींपर्यंतची तयारी श्रीपूजकांकडून सुरू आहे.

दुसरीकडे, कळंबा कारागृहात लाडू बनविण्याची लगबग सुरू असून त्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. देवस्थान समितीची मागणी येईल त्याप्रमाणे लाडू पुरविण्याची तयारी कारागृह प्रशासनाने केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराच्या परिसरात भजनी मंडळांचे कार्यक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे.मंडप तयारअंबाबाईच्या मुख्य गाभारा रांगेसाठी पूर्व दरवाजा ते शेतकरी बझारपर्यंत सुसज्ज मंडप उभारण्यात आला आहे. मांडवात फॅनपासून एलईडी स्क्रीन तसेच लोखंडी अडथळे उभारण्यात आले आहेत. भाविकांची संख्या वाढली तरी त्यांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मांडवाची लांबी वाढविण्यात आली आहे. विद्यापीठ हायस्कूल दरवाजा येथील मुखदर्शनाच्या रांगेसाठी तसेच मंदिरातील देवस्थान समितीच्या कार्यालयाशेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी सुरेख मंडप सजला आहे.प्रथमोपचार केंद्रभाविकांच्या सोईसाठी अंबाबाई मंदिराच्या परिसरातील उद्यान व मंदिराबाहेर पोलीस नियंत्रण कक्षाशेजारी अशा दोन ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘व्हाईट आर्मी’तर्फे या केंद्रांचे समन्वयन केले जाणार आहे. १०८, अ‍ॅस्टर आधार, अ‍ॅपल सरस्वती ही हॉस्पिटल्स, महापालिका, अंबाबाई श्रीपूजक मंडळ अशा विविध संस्थांतर्फे नऊ दिवस ही केंदे्र चालविली जाणार असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. परिसरात तीन रुग्णवाहिका असणार आहेत.विद्युत रोषणाईहेरिटेज समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गतवर्षी अंबाबाई मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या कामानंतर या रोषणाईसाठीचे वीजदिवे पुन्हा बसविण्यात आले आहेत. त्यांची तपासणी करून शुक्रवारी सायंकाळी ही विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली. विविध रंगांच्या दिव्यांमुळे मंदिराचे शिल्पसौंदर्य अधिक उजळून निघाले आहे.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर