संकेश्वरचा प्रवीण गडकरी मुरगूड अर्धमॅरेथॉनचा विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:31+5:302020-12-12T04:41:31+5:30

स्पर्धेचे उद्‌घाटन संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या ...

Praveen Gadkari of Sankeshwar is the winner of Murgud Half Marathon | संकेश्वरचा प्रवीण गडकरी मुरगूड अर्धमॅरेथॉनचा विजेता

संकेश्वरचा प्रवीण गडकरी मुरगूड अर्धमॅरेथॉनचा विजेता

Next

स्पर्धेचे उद्‌घाटन संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, शिवाजीराव पाटील, साताप्पा पाटील, नीलेश शिंदे, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, राजू आमते, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, नामदेव भांदिगरे, आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत सुधीर सावर्डेकर यांनी केले, तर आभार पांडुरंग पुजारी यांनी मानले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-

३ कि मी (१५ वर्षाखालील मुले) :-प्रथम क्रमांक- निखिल पंडित पाटील, बेले, द्वितीय क्रमांक केशव राजेंद्र पन्हाळकर इचलकरंजी, तृतीय क्रमांक सुहास मारुती ऱ्हायकर अवचितवाडी, ता. राधानगरी, चतुर्थ क्रमांक प्रथमेश साताप्पा पाटील, आवळी बु , पाचवा सिद्धार्थ हिंदुराव पाटील आवळी बु.,

अर्धमरेथॉन पुरुष :-प्रथम- प्रवीण मनोहर गडकरी, संकेश्वर, द्वितीय-इंद्रजित अशोक फराकटे, बोरवडे, तृतीय-सिद्धांत सुरेश पुजारी, कोल्हापूर,चतुर्थ-सुशांत मनोहर जेधे, सातारा, सत्यजित सुरेश पुजारी, कोल्हापूर.

अर्धमॅरेथॉन :महिला प्रथम गायत्री मलगोंडा पाटील, गडहिंग्लज, द्वितीय प्राजक्ता परशराम शिंदे, नेसरी,

तृतीय पायल अरुण मोरे, गडहिंग्लज ,चतुर्थ सृष्टी श्रीधर रेडेकर, नेसरी, पाचवा आदिती जयवंत खोत वाळवे खु.

४०० मी रिले पुरुष : प्रथम क्रमांक:- wrsf बिद्री, द्वितीय क्रमांक wrsf कोल्हापूर, तृतीय क्रमांक जे. के. ॲकॅडमी वाघापूर, चतुर्थ क्रमांक समर्थ ॲकॅडमी मुरगूड स्पर्धेचे नियोजन निशांत जाधव, रोहित मोरबाळे, गणेश तोडकर, राजू चव्हाण, पांडुरंग पुजारी, सुशांत महाजन, अरविंद नरके, दिग्विजय चव्हाण, आदींनी केले.

फोटो ओळ११ मुरगूड म’रेथॉन

मुरगूडमधील राज्यस्तरीय अर्ध मॅरेथॉन व रिले स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करताना प्रवीणसिंह पाटील, शिवाजीराव सातवेकर, नामदेव भांदिगरे, दिग्विजय पाटील, रणजित मगदूम,

स्पर्धेतील सहभागी स्पर्धक

Web Title: Praveen Gadkari of Sankeshwar is the winner of Murgud Half Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.