शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:58 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलिस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी (दि. २८) संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला व्यक्ती आज पुन्हा न्यायालय परिसरात दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.दरम्यान, पोलिस चौकशीत कोरटकरने पसार काळात दोन वाहनांचा वापर केल्याची तसेच त्याला मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाइकांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटकेतील कोरटकर याची पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत बुधवारी रात्री सुरू केलेली चौकशी गुरुवारी पहाटेपर्यंत पुन्हा दिवसभरही सुरू राहिली.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो पसार काळात कुठे फिरला? त्याला कोणी मदत केली? त्याने कुठे मुक्काम केले? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मोबाइलमधील डेटा का डिलिट केला? पसार काळात तो इतरांच्या मोबाइलवरून कोणाच्या संपर्कात होता काय? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पसार काळात पळून जाण्यासाठी त्याने स्वत:ची कार वापरली. त्यानंतर स्वत:च्या कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये, यासाठी एका मित्राची कार वापरली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त केल्या जाणार आहेत.मदत करणाऱ्यांची नावे निष्पन्नकोरटकरला कार देणाऱ्या मित्रासह मदत करणाऱ्या काही साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. यात काही नातेवाइकांचाही समावेश आहे. गरज पडल्यास त्यांचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी काही दिवसांत पोलिसांचे एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे.

अडचणीच्या प्रश्नांवर मौनअटक केल्यापासून कोरटकरने चौकशीत पोलिसांना सहकार्य केले आहे. मात्र, त्याच्या अडचणी वाढवणारे प्रश्न विचारताच तो मौन बाळगत आहे. त्याला बोलते करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस चौकशी करीत आहेत. रात्री-अपरात्री कधीही प्रश्नांचा भडिमार सुरू होत असल्याने त्याची अस्वस्थता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

गांधीनगरात वैद्यकीय तपासणीवैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी सकाळी त्याला गांधीनगर येथील प्राथमिक रुग्णालयात हजर केले. त्यानंतर दिवसभर चौकशीचे सत्र सुरू होते. पोलिस कोठडी संपत असल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अजून तपास बाकी असल्याने पोलिसांकडून आणखी काही दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागण्याची विनंती न्यायाधीशांकडे केली जाऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय