शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरने दिली धमकी, इंद्रजित सावंत यांनी तपासकामी कोल्हापूर पोलिसांकडे सादर केला मोबाइल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:11 IST

कोरटकरचा सुगावा लागेना

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला कधी अटक करणार? असा सवाल शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिसांना विचारला. इंद्रजित सावंत यांनी तपासकामी मोबाइल पोलिसांकडे सादर केला. पुराव्यांमध्ये छेडछाड होण्यापूर्वी कोरटकरला अटक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोरटकरच्या अटकेसाठी नागपूरला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.मंगळवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोरटकरला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. त्यानंतरही गेल्या चार दिवसांपासून कोरटकर पसार आहे. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांकडे केली. यावेळी इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.मोबाइल घ्या; तपास करासावंत यांनी तपासकामी त्यांचा मोबाइल जुना राजवाडा पोलिसांकडे सादर केला. कोरटकर याला तातडीने अटक झाली नाही तर तो पुरावे नष्ट करू शकतो. पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्यामुळे त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

कोरटकरचा सुगावा लागेनामोबाइल लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे शेवटचे लोकेशन नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आले होते. त्यानंतर त्याचा मोबाइल बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी सुरू आहे. इंदोर आणि पुसद येथे तो गेल्याच्या चर्चा गुरुवारी दिवसभर सुरू होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस