शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकर खासगी नाही तर पोलिसांच्या वाहनांतूनच रवाना, पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:27 IST

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर) याची कळंबा ...

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर) याची कळंबा कारागृहातून शुक्रवारी (दि.११) दुपारी सुटका करण्यात आली. तब्बल १६ दिवस तो कारागृहात होता. जुना राजवाडा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला कोल्हापूर विमानतळावर सोडण्यात आले. तेथून तो मुंबईकडे रवाना झाला.न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कारागृह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला.कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने दहाहून अधिक कर्मचारी त्याला बाहेर काढण्यासाठी तैनात केले होते. कारागृहातील अंडासेलमधून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढले. त्या वेळी जुना राजवाडा पोलिसांची वाहने कारागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आत लावली होती. कारागृहातून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कडक पोलिस बंदोबस्तात बाहेर आणण्यात आले. कारागृहाबाहेर पोलिसांचे जलद कृती दलही तैनात केले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह ६० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. अगदी दोन मिनिटे कालावधीत पोलिसांनी कारागृहातून त्याला वाहनांतून मुख्य रस्त्यावर आणले. तेथून कोल्हापूर विमानतळावर तातडीने नेण्यात आले. त्या वेळी सुरक्षेच्या कारणासाठी विमानतळ मार्गावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामीनन्यायालयाने कोरटकरला ९ एप्रिलला जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती. कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता केली. न्यायालयाने दिलेली जामिनाची ऑर्डर, जात मुचलक्याचे पैसे भरलेली कागदपत्रे, पोलिस संरक्षण मिळण्यासाठीचा अर्ज यांसह अन्य कागदपत्र न्यायालयासमोर ठेवली. त्यानंतर जामिनाची ऑर्डर घेऊन कोरटकरचे सहायक वकील कारागृह प्रशासनाकडे गेले. त्यानंतर कोरटकरची जामिनावर मुक्तता झाली.

पोलिसांच्या वाहनांतूनच रवानाकारागृहातून बाहेर पडताना एक खासगी चारचाकी वाहन पोलिसांच्या ताफ्यात होते. मात्र, या वाहनातून त्याला नेण्यात आले नाही. पोलिसांच्या वाहनातून त्याला कोल्हापूर विमानतळापर्यंत नेल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.

अटींचे पालन करण्याच्या सूचनाफिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगी शिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस