प्राध्यापकाच्या घरी चोरी, कारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:31 IST2019-04-24T16:26:59+5:302019-04-24T16:31:13+5:30
दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.

प्राध्यापकाच्या घरी चोरी, कारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास
कोल्हापूर : दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.
पोलीसांनी सांगितले, नंदकुमार कांबळे हे सुर्वेनगरला रावसाहेब जगताप यांच्या घरी भाड्याने राहतात. ते प्राध्यापक आहेत. घरी पत्नी आणि मुलगा असे तिघे असतात. लोकसभा निवडणुक ड्युटी असल्याने ते २२ एप्रिलला कामावर गेले. दोन दिवस त्यांचा बाहेर मुक्काम असल्याने त्यांच्या पत्नी लता व मुलगा हे माहेरी संभाजीनगरला राहण्यास गेले.
त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मुख दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे बदाम, चांदीचा करदोडा, पैजन यासह कपाटातील चावी घेऊन पार्किंगमधील कार (एच. एच. ०९ ई. के. ७१५२ घेऊन ते पसार झाले. मंगळवारी (दि. २३) रात्री घरी आलेनंतर त्यांना चोरीचा प्रकार समजला. लता कांबळे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत.