प्रकाश आवाडे यांचा सत्तारूढ गटाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:58+5:302021-04-30T04:30:58+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला. राजू शेट्टी, अशोक ...

Prakash Awade's support to the ruling party | प्रकाश आवाडे यांचा सत्तारूढ गटाला पाठिंबा

प्रकाश आवाडे यांचा सत्तारूढ गटाला पाठिंबा

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला. राजू शेट्टी, अशोक चराटी यांच्यानंतर प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा दिल्याने आघाडी भक्कम झाल्याचा दावा सत्तारूढ गटाने केला आहे.

दोन दिवसापूर्वी सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी लवकरच जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आघाडीला मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार गुरुवारी आमदार पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, ‘जवाहर’ कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम आदी उपस्थित होते.

‘गोकुळ’चा नावलौकिक देशात पोहोचला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतही दुधाला चांगला दर दिला. संघाचे कामकाज उत्तम असल्यामुळे सत्तारुढ आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

फाेटो ओळी :

‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला. त्यांचे स्वागत आमदार पी. एन. पाटील यांनी केले. यावेळी राहुल आवाडे, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक उपस्थित होते.

(फोटो-२९०४२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Prakash Awade's support to the ruling party