हातकणंगलेच्या सभापतिपदी प्रदीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:15+5:302021-01-23T04:24:15+5:30
सतीश पाटील शिरोली : जनसुराज्य शक्ती पक्षाचे डाॅ. प्रदीप नानासो पाटील यांची हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापतिपदी वर्णी लागली ...

हातकणंगलेच्या सभापतिपदी प्रदीप पाटील
सतीश पाटील
शिरोली : जनसुराज्य शक्ती पक्षाचे डाॅ. प्रदीप नानासो पाटील यांची हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापतिपदी वर्णी लागली आहे. पाटील यांच्या रूपाने टोप (ता. हातकणंगले) गावाला दुसऱ्यांदा सभापतिपदाचा मान मिळाला आहे. १९९८-९९ मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब बापूसाहेब पाटील यांनी सभापतिपद भूषविले होते. डॉ. प्रदीप पाटील हे टोप पंचायत समिती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात टोप, कासारवाडी, मनपाडळे, अंबपवाडी या गावांचा समावेश आहे. प्रदीप पाटील हे पेशाने डॉक्टर असले तरी रेडीमिक्स कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाला संधी मिळताच पक्षाने डॉ. प्रदीप पाटील यांना संधी दिली. पाटील यांना सभापतिपद मिळाल्याने टोपचा हातकणंगले तालक्याच्या राजकारणात दबदबा वाढला आहे. पाटील हे उच्चशिक्षित असून, उत्कृष्ट फुटबाॅलपटू आहेत. पाटील यांना हे पद मिळाल्याने टोप, कासारवाडी, मनपाडळे, अंबपवाडी गावांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
फोटो २२ प्रदीप पाटील
ओळी डॉ प्रदीप पाटील