शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:01 IST

डॉक्टर, नातेवाइकांची धांदल उडाली

कोल्हापूर : येथील सीपीआरच्या अतिदक्षता विभागातील वीज तासाभरासाठी खंडित झाल्याने डॉक्टर आणि नातेवाइकांची धांदल उडाली. जनरेटरही खराब झाल्याने अनेक इलेक्ट्रिक उपकरणे बंद पडली आणि नंतर मात्र गोंधळ उडाला. सुदैवाने तासाभरात वीजपुरवठा सुरळीत झाला आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.सर्व सीपीआरचाच वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत बंद पडला. आधीच या ठिकाणी नूतनीकरणाची सुरू असलेली कामे, त्यात पडणारा पाऊस, झालेला अंधार यामुळे रुग्ण आणि नातेवाईक हवालदिल झाले होते. अशातच अतिदक्षता विभागातीलही वीज खंडित झाल्याने अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरसह अन्य इलेक्ट्रिक उपकरणेही बंद पडू लागली. त्यामुळे या उपकरणांवर उपचार घेणारे रुग्ण अक्षरशः घामाघूम झाले आणि डॉक्टरांचीही धावपळ उडाली. लवकर वीज न आल्याने जी उपकरणे बॅटरी बॅकअपवर सुरू होती, त्या उपकरणांचे बॅटरी बॅकअपचेही अलार्म वाजू लागल्याने अतिदक्षता विभागात एकच गोंधळ उडाला.

अशा गंभीर परिस्थितीतही रुग्णांचे नातेवाईक,डाॅ क्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी मोबाईलच्या प्रकाशात उपचार सुरू ठेवले. रुग्णांची प्रकृती ढासळू नये म्हणून डॉक्टर, नर्सेस आणि नातेवाइकांची मोठी धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत तातडीने संबंधित यंत्रणाशी संपर्क साधण्यात आला आणि तासाभराने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. ही माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठही सीपीआरमध्ये दाखल झाले.

फारसे काही गंभीर झाले नसल्याचा आवअशाही परिस्थितीत याबाबत चौकशीसाठी फोन केल्यानंतर एका वरिष्ठांनी असे काही झाले नाही असे बेधडक सांगून टाकले, तर दुसऱ्या डॉक्टरांनी पाच, सहा मिनिटांसाठी वीज गेल्याचे कबूल केले. तासभर अतिदक्षता विभागातील वीज गेली तरी फारसे काही गंभीर झाले नसल्याचे चित्र निर्माण करण्यात येत होते.