शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाला स्थगिती, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 16:06 IST

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महामार्ग रोखला नाही. 

ठळक मुद्देमराठा आरक्षणाला स्थगिती, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आंदोलक व पोलीसांत झटापट, राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने

शिरोली :  मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महामार्ग रोखला नाही.  यावेळी आंदोलक व पोलीसांत झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टान अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने आज महामार्ग रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

 कार्यकर्ते तावडे हॉटेल येथे जमा होत होते; मात्र आज नीटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी बारा पर्यंत आंदोलक थांबून होते. यानंतर आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय भवानी - जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणा देत आंदोलक महामार्गाकडे गेले.

आंदोलक महामार्गावर येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यामुळे आंदोलक व पोलीसांच्यात झटापट झाली. पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. आजवर आम्ही शांतपणे आंदोलने केली मात्र आता आरक्षणासाठी मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल.

आरक्षण मिळाले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अन्यथा पुणे, मुंबईची दुध वाहतूक रोखण्याचा इशारा सचिन तोडकर यांनी दिला.

या आंदोलनात दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, रविंद्र मुतगी, राजेंद्र चव्हाण, उदय प्रभावळे, योगेश खाडे, आभिषेक सावंत, सचिन कांबळे, समरजीत तोडकर, मन्सुर नदाफ, नितीन देसाई, सुनिल चव्हाण, योगेश भोसले, ईश्वर पाटील, सम्राट शिर्के, महेश अनावकर, अनिकेत मुतगी,गणेश खोचीकर, विशाल खोचीकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.सकल मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता.

आंदोलकांपेक्षा पोलीसांची संख्या जादा असल्याचे चित्र आंदोलन स्थळी पहायला मिळाले. पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर,प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर