येळाणे येथील महिला भवनची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:07+5:302021-09-25T04:26:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात महिला बालकल्याण विभागाने दहा वर्षांपूर्वी येळाणे येथे महिला भवन ...

Poor condition of Mahila Bhavan at Yelane | येळाणे येथील महिला भवनची दुरवस्था

येळाणे येथील महिला भवनची दुरवस्था

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात महिला बालकल्याण विभागाने दहा वर्षांपूर्वी येळाणे येथे महिला भवन उभारले आहे. या इमारतीचे उद्घाटन होण्याअगोदर तिची दुरवस्था झाली आहे. महिला बचत गटासाठी बांधलेली इमारत पंचायत समितीने ताब्यात घेण्याअगोदर तिची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाचे जवळपास वीस लाख रुपये पाण्यात गेले आहेत. ज्या उद्देशासाठी इमारत बांधली होती, तो उद्देश सफल होताना दिसत नाही.

शाहूवाडी तालुक्यातील १३१ महसुली गावात १२१० महिला बचत गट कार्यरत आहेत. डोंगरकपारीतील वाड्या-वस्त्यांवरील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिला समक्षीकरणाचे जाळे विणले आहे. बचत गटांनी तयार केलेले पदार्थ एकाच छताखाली विकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाने २००८ साली २० लाख रुपये खर्चून महिला भवन बांधले. सुमारे तेरा वर्षे झाली तरी त्या महिला भवनचे उद्घाटन झालेले नाही. ती इमारत तशीच पडून आहे. इमारतीवरील संपूर्ण कौले फुटली आहेत. लोखंडी सामान तुटले आहे. इमारतीला गळती लागली आहे. इमारतीवर दोन झाडे पडली आहेत. इमारतीसभोवती झाडेझुडपे वाढली आहेत. इमारतीची दुरुस्ती होणार कधी? शाहूवाडी पंचायत समितीच्या अंतर्गत महिला बाल कल्याण विभागाने तालुक्याच्या गावागावांत १२१० महिला बचत गट कार्यरत आहेत. तालुक्यातील २५० महिला बचत गटांना ३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तालुक्यात महिला बचत गटाची चळवळ वाढविण्यासाठी शासनाने महिला बचत गटांना पाठबळ दिले पाहिजे. महिला भवनची दुरुस्ती करण्याची मागणी महिलांतून होत आहे.

फोटो

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथे महिला भवनची झालेली दुरवस्था.

Web Title: Poor condition of Mahila Bhavan at Yelane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.