शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात : पडळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 17:49 IST

OBC Reservation Bjp Kolhapur : राज्य सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. म्हणून या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ओबीसी मोर्चातर्फे २६ जून रोजी शहर आणि जिल्हयात मंडलनिहाय रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी घोषणा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली. या आंदोलनात सर्व पक्षातील ओबीसी नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी २६ जूनला रास्ता रोको आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा

कोल्हापूर : राज्य सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. म्हणून या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ओबीसी मोर्चातर्फे २६ जून रोजी शहर आणि जिल्हयात मंडलनिहाय रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी घोषणा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली. या आंदोलनात सर्व पक्षातील ओबीसी नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगूनही राज्य सरकारने ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला नाही. परिणामी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ३४६ उपजाती असलेले ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासही त्यांनी जाणीवपूर्वक विलंब लावला. अशाचप्रकारे सरकारची भूमिका राहिली तर ओबीसीचे नोकरी आणि शिक्षणातीलही आरक्षण संपू शकते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमानी पध्दतीने कारभार करीत ७ मे २०२१ रोजी पदोन्नतीमधील ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला. या आदेशाला काँग्रेसचे सरकारमधील नेते विरोध करू शकले नाहीत. गायकवाड आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार भाजपने मराठा समाजास आरक्षण दिले होते. तेही महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. यामुळे भाजपतर्फे सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरkolhapurकोल्हापूर